(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज अधिवेशनात राज्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस थकीत मानधान प्रोत्साहन भत्ता, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांचं प्रलंबीत मानधन अदा करणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, राज्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा यावर आज अधिवेशनात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्वाचे आहे.