(Gadchiroli Flood Situation ) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली ते नागपूर महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे इंजिन बंद पडून दोन बसगाड्या रस्त्यातच बंद पडल्या.
पाण्यात बंद पडलेल्या या दोन बसेस बाहेर काढण्यात आल्या असून त्यातील प्रवाशांची ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातच निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ठिकठिकाणच्या पुरामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात 20 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.