महाराष्ट्र

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

Published by : Lokshahi News

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई केली आहे. २५ जुलै रोजी नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन सी-६० व इतर अभियान पथकाचे जवान मिळुन उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगलपरिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधुन काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे.

गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

सदर प्रकरणात कुकर बॉम्ब १ नग, नक्षल पॅन्ट १ नग, नक्षल शर्ट १ नग, पिटु १ नग, शाल १ नग, प्लॅस्टिक शिट १ नग, बॅन्डेज पट्टी १ नग, चिमटा १ नग, व्हॅसलीन डब्बी १ नग, बॅटरी (व्हेलॉसिटी) १ नग, स्प्रिंग १ नग, ३०३ खाली केस १ नग, एसएलआर खाली केस १ नग, पेंचीस १ नग व पुस्तके ३ नग व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असुन इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump On Charlie Kirk : "चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला आहे", चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा

Navratri Rang : नवरात्रीत रंगीबेरंगी साड्यांमध्ये देवीची आरती, जाणून घ्या रंगांचा महिमा

Mumbai Airport : स्पाइसजेटच्या विमानाचं चाक हवेत निखळलं, पुढे जे काही झालं ते...

IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यावर केलेल्या ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे त्वरित प्रत्युत्तर, "यांना काय अधिकार?"