Gajanan Mehendale 
महाराष्ट्र

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

गजानन मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

  • गेली 5 दशके त्यांनी आपले आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केले.

  • गजानन मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार

(Gajanan Mehendale ) ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली 5 दशके त्यांनी आपले आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केले. शिवचरित्र, मुघलकालीन दस्तऐवज, युद्ध इतिहास आणि धार्मिक धोरणांवर त्यांनी सखोल अभ्यास करून अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले. मराठी, इंग्रजी, फारसी, उर्दू तसेच युरोपीय भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली होती.

मेहेंदळे यांनी ‘श्री राजा शिवछत्रपती’ (खंड 1 व 2), ‘Shivaji: His Life and Times’, ‘इस्लामची ओळख’, ‘आदिलशाही फर्माने’, ‘Tipu as He Really Was’ आणि ‘शिवछत्रपतींचे आरमार’ यांसारखी महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांचे ग्रंथ आज विविध विद्यापीठे आणि इतिहास अभ्यासक्रमांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून वापरले जातात.

वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना बांगलादेशमध्ये युद्ध सुरू होण्याच्या आधी पाठवण्यात आले होते.पत्रकार म्हणून त्यांनी सुरुवातीला ‘तरुण भारत’मध्ये काम केले. गजानन मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार असून, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय