Pune  
महाराष्ट्र

Pune : पुण्यात निकालाआधीच गणेश बिडकर यांचे बॅनर

आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.

आज मतमोजणी पार पडणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकांवर कोणाचा दबादबा राहणार हे आज स्पष्ट होणार असून आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात निकालाआधीच गणेश बिडकर यांचे बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर महापौर साहेब असा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नगरसेवकपदी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे म्हणत हे बॅनर लावण्यात आले आहे.

Summary

  • पुण्यात निकाला आधीच गणेश बिडकर यांचे बॅनर

  • बॅनरवर महापौर साहेब असा उल्लेख

  • नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दलचे लागले बॅनर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा