थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Ganesh Naik) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता वनमंत्री गणेश नाईकांची मतदान केंद्रावर धावपळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान यादीत नाव शोधण्यासाठी नाईकांना धावपळ करावी लागल्याची माहिती मिळत आहे. गणेश नाईकांनी कोपरखैरणे इथं मतदान केलं असून गणेश नाईकांनी नियोजनावर सवाल उपस्थित केला आहे. यावर गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "यादीमध्ये आमचे नाव नाही. शोधतोय मतदान करायचं की नाही. इथला मी आमदार, राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत ही हालत असेल तर सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असेल याचा अंदाज तुम्हीच घ्या."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "जर तुमची मतदान केंद्रावर नावं नसतील तर ती शोधा. तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क हा तुम्ही बजावा आणि लोकशाहीचा जागर अतिशय दणक्याने तुम्ही लोकांना दाखवा. निवडणूक यंत्रणा ढिसाळ आहे असं माझे मत आहे. आपले मतदान महत्त्वाचे आहे या शहराच्या विकासाकरता. म्हणून कोणाच्या दादागिरीला, पैशाला न भुलता. नवी मुंबईची जनता पैशाला भुलणार नाही. दादागिरीचा प्रयत्न झाला पण जनतेने तो मोडून काढलेला आहे." असे गणेश नाईक म्हणाले.
Summary
वनमंत्री गणेश नाईकांची मतदान केंद्रावर धावपळ
नाव शोधण्यासाठी नाईकांना करावी लागली धावपळ
गणेश नाईकांनी कोपरखैरणे इथं मतदान केलं