Ganpati Visarjan 
महाराष्ट्र

Ganpati Visarjan : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार

10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार

गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज

(Ganpati Visarjan)10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो.

बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आज ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पांचे निरोप देताना गणेशभक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच मात्र त्या सोबत पुढच्या वर्षी लवकर या…असे म्हणत भावूक देखील व्हायला होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chinchpoklicha Chintamani Visarjan : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ; गणेशभक्तांचा जल्लोष

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरवात

Lalbaugcha Raja Visrajan 2025 : पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Adani Group : भारत-भूतान ऊर्जा भागीदारीत मोठे पाऊल; अदानी पॉवर आणि ड्रक ग्रीन पॉवरचा प्रकल्प