महाराष्ट्र

Ganpati Special Trains; गणेशोत्सवानिमित्त कोकण वासियांसाठी रेल्वेचं मोठं गिफ्ट!

Published by : Lokshahi News

कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी संख्या अधिक असते. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत.

आता प्रवाशांच्या सोयीसाठी वातानुकूलित 8 विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले आहे. रेल्वेच्या वातानुकूलित विशेष गाड्या गणपती उत्सव-2021 दरम्यान आधीच घोषित करण्यात आलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त आहेत. कोकणामध्ये जाणाऱ्या आबालवृद्धांना या सोयीचा लाभ घेता येईल.कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही व गरजेनुसार आणखी सोय करण्यात येईल, कुठल्या ही प्रवाशांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा