( Badlapur ) बदलापूरमध्ये वायूगळती झाली असून बदलापूर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. बदलापूर शहराच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण निर्माण झालं. केमिकल कंपन्यांनी हवेत वायू सोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रात्रीच्या सुमारास केमिकल कंपनी मधून मोठ्या प्रमाणात वायू सोडला गेल्याने एमआयडीसी परिसरातच्या लगत असलेल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण निर्माण झालं रात्रीच्या वेळेस केमिकल कंपन्या वायू हवेत सोडतात यामुळे वातावरणात धुराचे लोट पसरतात. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागताना पाहायला मिळत आहे.