बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Baramati) बारामतीत 28 डिसेंबरला उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहे. यावेळी सुप्रिया सुळेंसह, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहेत. यावेळी पवार काका पुतण्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
गौतम अदानी आणि पवार काका-पुतण्या येणार एका मंचावर
शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
सुप्रिया सुळेंसह, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार