महाराष्ट्र

इंधन गॅस दरवाढीच्या विरोधात गेवराई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

Published by : Lokshahi News

बीड: विकास माने | केंद्र सरकारने केलेल्या सततच्या इंधन गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या विरोधात गेवराई तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करून तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम शेख, तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने सातत्याने इंधन गॅससह जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढविल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. महागाईची आग थेट स्वयंपाक घरापर्यंत आल्यामुळे सर्वत्र केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीच्या विरोधात गेवराई तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर तिव्र आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम शेख, तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, दत्ता दाभाडे, मोहन गव्हाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसिलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा