महाराष्ट्र

गोवा बनावटीची विदेशी दारू पकडली; कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

Published by : Lokshahi News

सतेज औंधकर | कोल्हापूर | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने गोवा बनावट विदेशी दारू पकडून मोठी कारवाई केली असून मुद्देमालासहित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या भरारी पथकाने गगनबावडा इथं वाहनांची तपासणी करत असताना बेकायदेशीररित्या गोवा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये ५५ बॉक्ससह दोघाना ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 3 लाख 17 हजार 280 रुपयांचा गोवा बनावटीचा देशी विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला असून या दारुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या स्विफ्ट कारसह भरारी पथकाने जप्त केली आहे. मात्र, सखोल तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर सर्व दारू आणि 6 लाख 92 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या भरारी पथकाने पुढील कारवाई सुरूच ठेवली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा