थोडक्यात
अमरावतीमध्ये चक्क 21 हजार रुपये किलो सोन्याची मिठाई
सोन्याच्या मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
दिवाळीनिमित्त दुकानदारांनी बनवली खास मिठाई
(Amravati) दिवाळी म्हटलं की गोडधोड आलंच. मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने लक्ष वेधेले आहे. देशभर चर्चेत असलेली ‘सोनेरी भोग’ मिठाई जी खऱ्या 24 कॅरेट सोन्याच्या वर्खने सजलेली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तर एक कलाकृती आहे. निवडक आणि उच्च दर्जाच्या सुकामेव्यासह पिस्ता, मामरा बदाम, केशर आणि हेजलनटसारख्या घटकांनी बनवलेली ही मिठाई खास आकर्षण ठरली आहे.
या मिठाईची किंमत ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. प्रतिकिलो तब्बल 21 हजार रुपये अशी त्याची किंमत आहे, तरीही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते आहे.