मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा म्हाडाच्या (MHADA) घरांची लॉटरी निघणार आहे. या माध्यमातून तब्बल तीन हजार घरांची सोडत निघणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट दिली असून प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. दिवाळीत ३ हजार म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
म्हाडाच्या लॉटरीतील घरं
अत्यल्प गट
इमारत - 4, घरं -736, फ्लॅटचं क्षेत्रफळ - 482.98 स्क्वेअर फूट
अल्प गट
इमारत - 4, घरं - 708, फ्लॅटचं क्षेत्रफळ - 322.60 स्क्वेअर फूट
मध्यम उत्पन्न गट
इमारत - 1, घरं - 227, फ्लॅटचं क्षेत्रफळ - 785.50 स्क्वेअर फूट
उच्च उत्पन्न गट
इमारत - 1, घरं - 105, फ्लॅटचं क्षेत्रफळ - 978.58 स्क्वेअर फूट