आज वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. उद्या 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्षी प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतो आणि त्या संकल्प पूर्तीच्या दिशेने वाटचाल करतो. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच बनली आहे.
यावेळी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे.
२०२१ वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे. (Happy New Year 2022) कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं. त्यामुळे आता २०२२ या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सर्वांनीच सुरुवात केली आहे. दरवर्षी नववर्षानिमित्त सर्वत्र जल्लोष केला जातो. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे नववर्ष साजरा करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता.