महाराष्ट्र

“शरद पवार यांचं अचानकपणे ओबीसी प्रेम उफाळून आलंय”

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षण आणि जाती-पातीच्या राजकारणावर टीका केली. यावर आता पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. शरद पवार यांचे ओबीसी प्रेम अचानक उफाळून आले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

असं म्हणतात की ते कुठलीही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतु कधी दाखवतही नाहीत. केंद्रानं ताट वाढले आहे  तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण ते कोणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पई पावण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाच मोठं केलं आणि जेव्हा जेव्हा आपण सत्तेचा भाग बनला, तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
 
काय म्हणाले पडळकर ?

जो २०११ सालचा सेन्सेस अहवाल तुम्ही आता मगाताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या..  जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारायचंय, तुम्हाला जातीनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय असा सवाल ही केला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही  प्रक्रीयाच सुरू केलेली नाहीये…  नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं,  ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते.. अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडायला लागतेय… हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल