Gopichand Padalkar and uddhav thackeray  team lokshahi
महाराष्ट्र

Gopichand Padalkar | 'अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा'

गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published by : Shweta Chavan-Zagade

औरंगाबाद ( Aurangabad ) नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (Ahilya Nagar) करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. याबाबत पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे.

पडळकरांनी म्हटलं आहे की, हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, असं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.

आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात?

गोपीचंद पडळकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? 'अहिल्यानगर' नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप