eknath shinde  Team lokshahi
महाराष्ट्र

Ashadi Mahapooja : स्वच्छ, सुविधायुक्त पंढरपूर साकारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

12 कोटी जनतेच्या वतीनं आज मी विठू माऊलीची पूजा केली. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातले.

Published by : Team Lokshahi

Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीचा सोहळ्यास आज पंढरपुरात उत्साहात सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीभावाने पूजा केली. यावेळी बीडच्या नवले दांमप्ताला पहिला वारकऱ्याचा मान मिळाला. नवले दांमत्य गेल्या १२ वर्षांपासून वारी करत आहे.

महापूजेनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मी विठ्ठलाकडं प्रार्थना केली. वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार असून स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळं वारकऱ्यांना सर्व मदत केली जाईल. माझ्यासाठी आजचा दिवस आनंदा आहे. 12 कोटी जनतेच्या वतीनं आज मी विठू माऊलीची पूजा केली. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातले.

लाखो वारकरी पंढरपुरात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत पंढरीत दाखल झाले. गेली दोन वर्ष कोरोनामुळं कार्यक्रम होऊ शकला नाही. यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह चांगलाच होता. कोरोनाचं संकट गेलं पाहिजे. ते जातंय, परत वाढतंय; पण आता त्याची जाण्याची वेळ आली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पांडुरंगाच्या मुख्यमंत्र्यांनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद