Gutkha company owners 
महाराष्ट्र

Gutkha company owners : गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागण्याची शक्यता; मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कडक निर्देश दिल्याची माहिती

गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Gutkha company owners) गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कडक निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले असून गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाईचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आले आहे.

मुंबईत ही गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधीत गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवेध व्यवसायातील सूत्रधारांवरच कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असं निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवर मकोका लागणार?

  • मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक निर्देश दिल्याची सूत्रांची माहिती

  • गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाईचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा