महाराष्ट्र

‘हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला’; भाजप आमदाराची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Published by : Lokshahi News

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. भाजपचे नेते रोजच्या रोज महाविकास आघाडी सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'सत्यवादी' म्हटल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट राजा हरिश्चंद्राची उपमा दिली आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत…' या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात,' असा सणसणीत टोला भातखळकर यांनी हाणला आहे.

राऊत यांच्या या वक्तव्याचा भातखळकर यांनी तिरकस शब्दांत समाचार घेतला आहे. 'राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

'चित्रा वाघ 'गब्रू प्रकरणी' रोज सरकारची लाज काढताहेत, त्यामुळं कागदी वाघानं त्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लावलं. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करताहेत. काय लायकीची माणसं आहेत ही?,' असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात