मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवीन घरी म्हणजेच 'शिवतीर्थ'वर दिग्गज नेते मंडळींची रेलचेल सूरू आहे. त्यात आता आणखी एका नेत्याने राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी भेट घेतली. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कन्या अंकित पाटीलसह ते 'शिवतीर्थ'वर दाखल झाले होते.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील लेकीसह गेले होते. कन्या अंकित पाटील यांच्या लग्नाची पत्रिका हर्षवर्धन पाटलांनी राज ठाकरे यांना दिली.अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.