महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील यांची कन्या होणार ठाकरे घराण्याची सून…

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी, इंदापूर | भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांची कन्या लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. यानिमित्त लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे दाखव होत निमंत्रण दिले. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे (Bindu Madhav Thackeray) यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील (Ankita Patil) यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे.मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी 17 डिसेंबरला भोजन सोहळ्याचं आयोजन केलं आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे.

कोण आहेत निहार ठाकरे ?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका

Saamana Editorial : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे';सामनातून टीका

Maharashtra Assembly Monsoon Session : आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार