महाराष्ट्र

CM Relief Fund : 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'चे कार्य पारदर्शकतेने होईल - फडणवीस

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पारदर्शकतेसाठी फडणवीसांचे आवाहन

Published by : Team Lokshahi

"रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे," असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन अकादमी (मित्रा) येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कक्ष प्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की, 2014 पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त भावनेने करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळवून देणे, हा यामागचा मूळ उद्देश आहे. या कक्षाला परदेशातील औद्योगिक व सामाजिक दायित्व निधीचे (CSR) मान्यता प्रमाणपत्र मिळाले असून, हे भारतातील पहिले उदाहरण आहे. या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावरही कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे निधीच्या वितरणात पारदर्शकता येईल व धर्मादाय रुग्णालयांमधील सेवांचे योग्य व्यवस्थापन करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्ताविक करताना कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी ‘रुग्णमित्र’ योजना मतदारसंघनिहाय सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत सामाजिक संस्थांची मदत घेऊन, केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रशासकीय अधिकारी आणि प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे, सहकक्ष प्रमुख शरद घावटे, उपकक्ष प्रमुख शेखर नामदास, जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश सकवान, वैद्यकीय समन्वयक डॉ. सवानंद सोनार आणि प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते यांच्यासह राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा