थोडक्यात
मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी
महत्त्वाच्या याचिकेवर पार पडणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
(Maratha Reservation) मराठा आरक्षणासंदर्भात आज सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. 2 सप्टेंबरला निघालेल्या जीआर नुसार हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते, त्यानंतर ओबीसी समाजातील अनेक जातींनी यावर आक्षेप घेतला.
महत्त्वाच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. यासंदर्भातील याचिका देखील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या मात्र या याचिकांच्या सुनावणीला वेळ लागत असल्याने सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.