थोडक्यात
मतदार यादीमधील घोळासंदर्भात आज सुनावणी
आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी
42 याचिकांपैकी 4 याचिका फेटाळल्यानंतर आज 38 याचिकांवर होणार निर्णय
(Voter List) सीमांकन मतदार यादी आणि मतदार यादी मधील घोळासंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 42 याचिकांपैकी 4 याचिका फेटाळल्यानंतर आज 38 याचिकांवर निर्णय होणार आहे. जवळपास 42 याचिका दाखल झाल्या होत्या, यातील 4 याचिका मंगळवारी फेटाळल्या होत्या.
आता 38 याचिकांवर कोर्ट निर्णय देणार आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी सुरू असून आता 38 याचिकांवर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.