थोडक्यात
राज्यात पावसाचा जोर कायम असून विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
बीड मधील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर
(Beed Heavy Rain) राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा आष्टी, शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला. या ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
दोन दिवस 15 पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून बीडमध्ये असलेल्या माजलगाव आणि मांजरा धरणातून अद्यापही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. यातच पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर आज बीड मधील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.