थोडक्यात
विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे
अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर
(Ahilyanagar Rain) राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला असून पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांना नदीचं स्वरुप आले आहे.
पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग, तसेच बोलेगाव आणि वारुळाचा मारुती कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून सरकारने तात्काळ पंचनामे करवे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.