थोडक्यात
चंद्रपूरात जिल्ह्यात मुसळधार पाऊस
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
(Chandrapur Heavy Rain) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्हात मागील चोवीस तासांपासून पाऊस सुरु आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे नदी, नाल्यांचा पातळीत वाढ झाली असून नदी काठावरील शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सतत होणाऱ्या पावसामुळे धरणाचा पातळीत वाढ झाली आहे. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जिल्हात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळा सकाळी सुरू झाल्या असतील त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.