महाराष्ट्र

चोरांनी चक्क ATM मशीनच लांबवलं !

Published by : Lokshahi News

चाळीसगाव शहरात चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच लांबवल्याची घटना घडली आहे. या मशीनमध्ये 17 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहरातील भडगाव रस्त्यालगत खरजई रस्त्यावर असलेल्या एटीएम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. स्टेट बँकेचे एटीएम मशीन होते. या एटीएममध्ये जवळपास 17 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगण्यात येत आहे.चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेली.

एटीएम मशीनच रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या मशीनमध्ये 17 लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून. ही घटना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विनोद खैरनार रात्री 3 वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना उलगडा झाला आहे.

दरम्यान चोरट्यांनी चारचाकी वाहनातून एटीएम मशीन चोरुन नेल्याने पोलीस चारचाकी वाहनाबाबत काही सुगावा लागतो यादृष्टीने तपास करीत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?