जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरम पनाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान. सांगली मध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलत असताना संभाजी भिडे यांची जीभ घसरली
हा देश जगाचा बाप बनवा यासाठी मोठी मोहीम शिवाजी महाराज यांनी हाथी घेतली होती. ती मोहीम पार पडण्यासाठी आपण मोहीम करतो. मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनामुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतो.
कोरोना येतो हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणार कोरोना आहे. कोरोना हा थाटात आहे. चीन ने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्देवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.