थोडक्यात
चंद्रपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी
16 तारखेला ही सुट्टी देण्यात आली आहे
( Chandrapur School ) चंद्रपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याकरिता चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होत असतात.
त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठी गर्दी, वाहतुकीची कोंडी होते. वाहतुक व रहदारी सुरळीत सुरू राहावी तसेच कोणतेही अनुचित घटनाघडू नये म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
16 तारखेला ही सुट्टी देण्यात आली असून चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना सुट्टी असणार आहे.