यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील गुन्ह्यांची टक्केवारी कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना राज्यभरात वाढलेल्या गुन्हेरागारीच्या टक्क्यावर टीका केली. राज्यातील बलात्कांराचा संख्या दहा टक्क्यांनी घटल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या ९५९ ने घटल्याचे त्यांनी सांगितले.
पॉक्सो अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांमध्येही घट झाली असून कायदा व सुव्यवस्थेची आकडेवारी भाजपा सरकारपेक्षा घटल्याचे देशमुख म्हणाले. राज्यातील कन्व्हिक्शन रेट देखील १३ टक्क्यांनी वाढल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना, देशभरातील गुन्ह्यांमध्ये राज्याच्या स्थितीचे वर्णन केले. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशभरात २२ व्या स्थानी आहे. तर खून आणि हत्येच्या प्रकरणांमध्ये २५ व्या ठिकाणी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.