मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी पोलिस अंमलदारांना बढती देण्याच्या निर्णयावर आज स्वाक्षरी केली. यामूळे, पोलिस अंमलदार बढतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील तब्बल ४५ हजार पोलिस अंमलदार आता हवालदार होणार आहे. शिवाय राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ह्यांनी ट्वीट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. ट्वीट मध्ये ते म्हणाले, "या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण निश्चितपणे कमी होईल"