Homeopathic Doctor  
महाराष्ट्र

Homeopathic Doctor : होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द

होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत.

Published by : Team Lokshahi

(Homeopathic Doctor ) होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथीचे उपचार करता येणार नाहीत. 'IMA'च्या तीव्र विरोधामुळे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने 30 जूनला जो निर्णय घेतला होता तो मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहिण्याची अनधिकृत परवानगी नाकारण्यात आली आहे.

राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात जो नवीन निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा, यासाठी ॲलोपॅथी डॉक्टर संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला होता. CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण करणाऱ्या BHMS डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी होऊन ॲलोपॅथी पद्धतीचे काही प्रमाणात उपचार करण्याची परवानगी सुरुवातीला देण्यात आली होती. मात्र IMA आणि इतर वैद्यकीय संघटनांनी गंभीर विरोध दर्शवला. रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खूप हानिकारक होऊ शकते असते त्यांचे म्हणणे होते. एमबीबीएस आणि CCMP यांच्यातील शिक्षणात खूप मोठा फरक आहे त्यामुळे कोणत्याही रुग्णाला होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथीची औषधे लिहून दिल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच ॲलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने हा निर्णय मागे घेतला असून येत्या 15 जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी तूर्तास थांबवली आहे. त्यामुळे आता होमिओपॅथी डॉक्टरांना अधिकृतपणे ॲलोपॅथीचे औषधे रुग्णांना लिहून देता येणार नाहीत. तसे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर ! मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून आईचा आक्रोश

Ajit Pawar : 'चीनहून होणारी निकृष्ट बेदाण्यांची आयात थांबवा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी