Hotel and Restaurant Strike 
महाराष्ट्र

Hotel and Restaurant Strike : आज राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार; कारण काय?

आज महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

( Hotel and Restaurant Strike ) आज महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर सरकारने अवाजवी कर लादले आहेत. 2025-26 साठी परवाना शुल्कात 15 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

मद्यावरील वाढवलेला कर, परवाना शुल्कातील आणि उत्पादन शुल्कातील भरमसाठ करवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेने (आहार) आज (14 जुलै ) रोजी बंद पुकारला आहे. सरकारने जी करवाढ केली आहे ती अन्यायकारक असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या निषेधार्थ आज (14 जुलै ) रोजी राज्यातील 20,000 पेक्षा जास्त हॉटेल आणि रेस्टॉरंटनी बंदचा इशारा दिला आहे. या सगळ्यांचा निषेध म्हणून असोसिएशन ऑफ होटेल्स अँड रेस्टॉरंट्स’ (आहार- AHAR ) संघटनेच्यावतीने संपाचा इशारा देण्यात आला आहे.या राज्यव्यापी बंदमध्ये तब्बल 20 हजार हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे

Latest Marathi News Update live : मी अद्याप राजीनामा दिलेला नाही; जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

Ind Vs Eng 3rd Test Match : भारतीय संघ अडचणीत; मध्यांनापर्यंत 8 गडी बाद, रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी

Gatari : 'गटारी' म्हणजे काय?, गटारी का साजरी केली जाते ? जाणून घ्या