(Nagpur) नागपूरमधील सक्करदरा परिसरात उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान मानवी सांगाडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेसा पावर हाऊसजवळ सुरू असलेल्या खोदकामाच्या कामात शुक्रवारी दुपारी मजुरांना हाडांचा सांगाडा आढळला. या प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरील मजुरांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथका त्या ठिकाणी पोहचून पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावण्यात आले असून पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने सांगाडा तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.
हा सांगाडा किती वर्षांपूर्वीचा आहे, तो स्त्रीचा की पुरुषाचा, तसेच मृत्यूचे कारण याबाबत प्रयोगशाळेत सविस्तर तपास केला जाणार असल्याची माहिती मिळत असून तपासाच्या निष्कर्षांनुसार पुढील कारवाई होणार आहे.या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.