महाराष्ट्र

St Employee Strike | नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो संपकरी एसटी कामगार मुंबईसाठी रवाना…

Published by : Lokshahi News

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे मागणीसाठी राज्यभरातील एसटी कामगार आक्रमक झाले असून आंदोलन करत आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो एसटी कामगार उद्या होणाऱ्या मोर्चासाठी मुंबईसाठी निघाले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा तिसऱ्या दिवशीही ठप्प राहणार असून प्रवाशांचे हाल होणार आहेत.

लढा विलिनीकरणाचा यासाठी एसटी कामगार आक्रमक झाले असून त्याचा पडसाद नंदुरबार जिल्ह्यातही उमटला आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो एसटी कामगार उद्या होणाऱ्या मोर्चासाठी मुंबईसाठी निघाले आहेत. संपातून कोणताही तोडगा न निघाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा तिसऱ्या दिवशीही ठप्प राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार. सर्वाधिक फटका नोकरदार आणि विद्यार्थ्यांना आणि परराज्यात जाणाऱ्या प्रवाश्यांना बसणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...