महाराष्ट्र

मला या प्रकरणात गोवण्यात आलं, प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे- सुनिल पाटील

Published by : Lokshahi News

मुंबई | आपण एनसीबीसाठी ट्रम्प कार्ड असून आर्यन खान प्रकरणी कुठेही वाच्यता करायची नाही, असं धमकावत धवल भानुशाली, मनिष भानुशाली आणि दिल्लीच्या एका व्यक्तीने आपल्याला मारहाण केल्याचा दावा सुनील पाटील यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेल्या सुनिल पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

सुनील पाटील म्हणाले की, "आपल्याला चार-पाच दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली यांनी दिल्लीला बोलावलं. मी त्यावेळी अहमदाबादमध्ये होतो.दिल्लीमध्ये त्यांनी मला एका हॉटेलमध्ये ठेवलं. त्यावेळी मला कुठेही बाहेर जायचं नाही, तू एनसीबीसाठी ट्रम्प कार्ड आहेस, कुणाशीही बोलायचं नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मला मारहाण करण्यात आली."

मुंबई ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि अरबाज खान यांचं एनसीबीच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं असाही खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे.या प्रकरणाची टीप आपल्याला मिळाली नव्हती तर निरज यादव या मध्य प्रदेशमधील भाजपच्या कार्यकत्याने याची टीप मनिष भानुशालीला दिली होती, असंही सुनील पाटील म्हणाले.पुढे पाटील म्हणाले की, "आर्यन खान केस प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, आपण फक्त यामध्ये ५० लाखाची डील केली होती. नंतर ती डील कॅन्सल झाल्याचं सॅम डिसुझाने सांगितलं. मनिष भानुशालीचे गुजरातमधील भाजपच्या मंत्र्याशी जवळचे संबंध असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे." एकूणच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं असून रोज या प्रकरणाशी संबंधित नवनवे आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!