महाराष्ट्र

१९ नोव्हेंबरला सर्व टीकेला पुराव्यांसह उत्तर देईन- विक्रम गोखले

Published by : Lokshahi News

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते व सध्या कंगणा रणौतच्या वादग्रस्त विधानाला समर्थन देणारे विक्रम गोखले सध्या टीकेचा धनी ठरत आहेत. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केले जात आहे. या सर्व आरोप आणि टीकाकारांना आता विक्रम गोखले प्रत्युत्तर देणार आहेत. १९ नोव्हेंबरला सर्व टीकेला पुराव्यांसह उत्तर देईन, असे विक्रम गोखले म्हणाले आहेत.

भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या कंगना रणौतच्या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलं होते. या समर्थनानंतर त्यांना टीकाकारांनी लक्ष केले होते. या सर्व घटनेनंतर विक्रम गोखले यांची नवी प्रतिक्रिया समोर आलीय. "माझं त्या दिवशीचं भाषण तुम्ही ऐकलंय का, मी कंगना रणौतला ओळखत देखील नाही. माझी आणि तिची ओळख नाही आणि कधीच सोबत काम केलेलं नाही. माझ्याविषयी जे काही लिहून आलंय त्याचं उत्तर मी १९ तारखेला देणार आहे. त्या दिवशी मलाही कुणीही प्रश्न विचारणार नाही. कंगना जे म्हटली ते खरं आहे. प्रत्येक न्यूज चॅनल आणि पत्रकार मी पुराव्यांसह काय म्हणतोय ते ऐकतच राहील, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

विक्रम गोखले एका मुलाखतीच्या ट्रेलरमध्ये बोलत होते. मात्र,१९ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत विक्रम गोखले कोणते पुरावे दाखवतात आणि काय नवे वक्तव्यं करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा