महाराष्ट्र

‘शिवेंद्रराजे भेटले नाहीत तरी त्यांना गाठणारच’, उदयनराजेंचं वक्तव्य

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात ही भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.यावेळी उदयनराजेंना शिवेंद्रराजेंच्या प्रश्नावर पत्रकारांनी छेडलं असता शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच असं वक्तव्य त्यांनी केल‌ं आहे. आ.शिवेंद्रराजे भोसले यांची भुमिका या निवडणुकीत महत्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याला खुप महत्व प्राप्त झालं आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना टोला लगावला होता. ते म्हणाले की, 'मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही.' त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणातही खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा