महाराष्ट्र

आव्हाडांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – अतुल भातखळकर

Published by : Lokshahi News

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली. या बातमीनंतर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची अटक करून जामीनावर हे प्रकरण थांबणार नाही आहे. आव्हाडांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.तसेच मुख्यमंत्र्यांनी केली नाही तर आम्ही राज्यपालांना विनंती करू असे भातखळकर म्हणाले.

गुंड लोकांचे हे सरकार आहे. या भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी मंत्रीमंडळातील एक-एक मंत्र्यांच्या अटकेला प्रारंभ झाला आहे. आव्हाडांचा पहिला लागला आता देशमुखांचा नंबर लागणार आहे, असेही भातखळकर म्हणाले आहेत.

गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेऊ नये

ठाण्यातला सिव्हील इंजिनिअर तरुणाचे अपहरण करणे, मारहाण करणे या प्रकरणात सव्वा वर्ष आम्ही न्याय मागत होतो, कोर्टाने आज अखेर न्याय दिला.जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. आता अशा गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवता येऊ नये असे विधान किरीट सोमय्या यांनी केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले