महाराष्ट्र

हवामानाचा लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

Published by : Lokshahi News

परभणी | मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते.या दाट धुक्यात परभणीकर हरवून जातायेत. मागील 3 चार दिवसापासून सूर्यदर्शन ही झालं नाही आहे. आज भल्या पहाटे पासून परभणीत दाट धुक्‍याची चादर पसरली होती.

पहाटे फिरायला येणारी मंडळी या धुक्यात हरवून गेल्याच बघायला मिळाले. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. परभणी शहरात साडे सात वाजेपर्यंत दाट धुक्‍याची चादर पसरलेली असते.

तर दिवस भर थंड गार वाऱ्याबरोबर ढगाळ वातावरण राहत आहे, तर रात्रीला कडाक्याची थंडी पडत आहेत. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे खोकला, सर्दी आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

RBL Bank: आरबीएल बँकेची 12 कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी-शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप

RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."