मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामना सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सामन्याआधी प्रेक्षकांना मुंबई पोलिसांकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या सूचना-
कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह झेंडे, बॅनर, पोस्टर्स, टेम्पलेट्स बाळगण्यास सक्त मनाई आहे.
प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारची पिशवी, पाण्याची बाटली, पॉवर बँक, लायटर, आगपेटी, सिगारेट, गुटखा तंबाखू यांसारख्या धूम्रपानाशी संबंधित वस्तू बाळगण्यास मनाई आहे.
मॅच पासवर दिलेल्या सर्व नियमांचे पालन करा आणि घरापासून मैदानापर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा कारण मैदानाच्या आत किंवा बाहेर कुठेही पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही.
सामना सुरू होण्यापूर्वी थोडे आधी पोहचा जेणेकरून शेवटच्या क्षणी गर्दी होणार नाही.
काल मंगळवारी १ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिव जय शहा, आयसीसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.