महाराष्ट्र

SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Published by : Lokshahi News

SBI, HDFC, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी देत ​​आहेत, ती ३० सप्टेंबर २०२१ ला बंद होणार आहे. बँकांनी मे २०२० मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आणली होती. या FD मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा ०.५० टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजदरासाठी ही योजना होती. म्हणजेच नियमित ग्राहकाला मिळालेल्या व्याजापेक्षा १ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

विशेष एफडी योजना

बँकांमध्ये ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना आहे. ती ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवली होती, त्यानंतर ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.आता ३१ मार्चपर्यंत, मार्चनंतर ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली होती, त्यामुळे तारीख आणखी वाढवली जाण्याची फारशी आशा नाही.

● SBI : सध्या सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी एसबीआयमध्ये ५.४ टक्के व्याजाचा लाभ मिळतो. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेंतर्गत एफडी घेतली तर त्याला ६.२० टक्के व्याज मिळते. ही योजना ५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे.

● HDFC Bank : एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा सुरू केली. बँक या ठेवींवर ०.७५ टक्के अधिक व्याज देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत मुदत ठेव केली तर एफडीवर ६.२५ टक्के व्याजदर लागू असेल.

● बँक ऑफ बडोदा (BoB) : बँक ऑफ बडोदा (५ वर्षे ते १० वर्षे) च्या विशेष FD योजनेंतर्गत, ज्येष्ठ नागरिकाने मुदत ठेव केल्यास FD वर ६.२५ टक्के व्याज लागू असेल.

● ICICI बँक : ICICI बँकेने ICICI बँक गोल्डन इयर्स योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष FD योजना सादर केली आहे. बँक या योजनेमध्ये ०.८० टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ६.३० टक्के व्याजदर देत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?