सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. या दिवसांमध्ये सर्वत्र आनंदचे उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते पण अशा परिस्थितीत अंबरनाथ शहरासह संपूर्ण अंबरनाथ विभागात लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. ही भीती निर्माण आहे अंबरनाथ शहरात वाढलेल्या चोरीच्या प्रमाणामुळे. चोरट्यांनी मंगळवारी रात्री उशिरा एक मेडिकल आणि एक ज्वेलर्स दुकान फोडून मोठी चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरात झालेल्या या चोरीमुळे आणिन वाढत्या चोरी-घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदय नगर परिसरात गेटवेल मेडिकल आणि जय सद्गुरू नावाचं ज्वेलर्स दुकानमध्ये मध्यरात्री तीनच्या सुरामास चोरी झाली. ही चोरी करताना चोरट्यांनी
कटरच्या सहाय्याने कुलूप, ग्रील आणि शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर मेडिकलच्या दुकानातून 30 हजार रूपये रोख रकमेसह काही सामानही चोरून नेलं. तर जय सद्गुरु ज्वेलर्समधून तब्बल 18 तोळे सोनं, तीन ते चार किलो चांदी यावर डल्ला मारला. एवढाच करून चोर थांबेले नाहीत तर आपल्या चोरीचा कोणाला सुगावा लागू नये यासाठी चोरांनी दोन्ही दुकानातील CCTV कॅमेरे देखील चोरून नेले. परंतु शेजारी असलेल्या एका दुकानातील कॅमेरामध्ये हे चोर कैद झाले आहेत. अंबरनाथमध्ये घडणाऱ्या या घटनेवर पोलिसांनी बोलायला नकार दिला आहे.