महाराष्ट्र

वर्ध्यात ‘लालनाला’ धरणाचे ५ दरवाजे उघडले

Published by : Lokshahi News

प्रतिनिधी | भूपेश बारंगे
संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस सतर्कतेचा इशारा केला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्ह्यात आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणाने पातळी गाठली नसली तरी पावसाच्या अंदाजानुसार समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील लाल नाला धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी 10 सेंटीमीटर ने उघडण्यात आले.

सध्या या दरवाज्यातून 25.07 क्युमेंक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या संलग्न डोंगरगाव, असोला, नारायणपूर,चिखली, कोरा,मंगरूळ,सिल्ली, दसोडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.वर्मा यांनी केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?