महाराष्ट्र

दक्षिण मुंबईत आम आदमी पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन

Published by : Lokshahi News

दिल्लीच्या सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाने आता मुंबईतील राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दक्षिण मुंबईत आम आदमी पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. गुरबीर सिंग, मुंबई प्रेस क्लबचे चेअरमन आणि नरेश वाबळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

"भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे मुंबई खचली आहे, आणि शहरातील राजकारणी आंधळे झाले आहेत, आणि आपल्या नागरिकांच्या समस्यांबद्दल ते उदासीन आहेत. हे बदलले पाहिजे असे, आप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.

आपच्या दक्षिण मुंबई कार्यालयाचे उद्घघाटन हे एका मोठ्या मोहिमेचा भाग आहे. या कार्यालयाच्या उद्धघाटनाद्वारे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू इच्छितो. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवाज बनू इच्छितो. आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्यासाठी, आमच्या संस्थेचा एक भाग म्हणून आणि मुंबईच्या गरजांसाठी व सामाजिक सुधारणांसाठी आम आदमी पार्टीचा एक वाहन म्हणून वापर करण्यासाठी आम्ही सर्व क्षेत्रातील मुंबईकरांचे स्वागत करतो. " असे प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा