थोडक्यात
ऐन महागाईत शिक्षण खर्चात वाढ
दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ
(SSC - HSC exam fee) ऐन महागाईत शिक्षण खर्चात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना याचा धक्का बसला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ करण्यात आली असून यामुळे आता पालकांच्या खिशाला फटका बसला आहे. आधीच महागाईची झळ बसत आहे आणि यात आता परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
दहावीसाठी 470 तर बारावीसाठी 490 रुपये शुल्क आकारण्यात येत असून दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नवीन नोंदनी 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे. पालकांकडून या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.