महाराष्ट्र

MPSC Exams : विद्यार्थ्यांना दिलासा; स्पर्धा परीक्षांची वयोमर्यादा वाढवली

Published by : Lokshahi News

राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

कोरोना काळात नोकर भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नव्हत्या. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पार झाली होती. या पार्श्वभूमिवर पुढील काळात होणाऱ्या नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी; जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली होती.

https://twitter.com/AshokChavanINC/status/1458396097030733835

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत अभिनेत्री सायली संजीवने केली गणरायाची प्राण प्रतिष्ठापना

Latest Marathi News Update live : जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अटीशर्थीसह परवानगी

Ganesh Chaturthi 2025 : "माझी आई व बाबा पाच वर्षापासून...." लग्नाबाबत बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच मोठ वक्तव्य

Ganeshotsav 2025 : अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन