महाराष्ट्र

ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजातील NCC च्या विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; व्हिडीओ आला समोर

विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेक जण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

शुभम कोळी | ठाणे : ठाण्यातून धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. यात एनसीसीचे हेड विद्यार्थ्यांना अमानुष माराहाण करताना दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेक जण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसत आहेत.

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणा पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असते. मात्र, ही शिक्षा आशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेक जण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे.

एनसीसीचे हेड हे सिनियर विद्यार्थीच असतात ते कोणी शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. याने एनसीसीच्या मार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असे सुचित्रा नाईक यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा